मंचर -आंबेगाव तालुक्यातील विविध 16 गावांमध्ये आढळलेल्या 44 करोना बाधित रुग्णांपैकी तब्बल 26 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला. 17 जणांवर पुणे व मंचर येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, तर 9 गावे करोनामुक्त झाली आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. तालुक्यात प्रशासनाने 17 गावे प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केली होती.
44 बाधितांपैकी 22 पुरुष व 22 महिला 6 ते 74 वर्षे वयोगटांतील आहेत. साकोरे, जवळे, पिंगळवाडी (लांडेवाडी), एकलहरे, घोडेगाव, मंचर, अवसरी बुद्रुक, नारोडी, पारगांव व चपटेवाडी या 10 गावांमध्ये प्रत्येकी एक बाधित आढळला, तर शिनोलीमध्ये 4, निरगुडसर 5, वडगांव काशिंबेग 8, गिरवली 6, वळती 2, फदालेवाडी/उगलेवाडी 3, पेठमध्ये 6 असे 17 गावांमध्ये 44 रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले होते. जवळे, पिंगळवाडी (लांडेवाडी), घोडेगाव, एकलहरे, साकोरे येथे प्रत्येकी एक रुग्ण, गिरवली 3, वळती 2, फदालेवाडी/उगलेवाडी 3, वडगाव काशिंबेग 7, शिनोली 4 आणि पेठ 2 असे 10 गावांतील 26बाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले, तर नारोडी येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
26 जणांचे फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. शिनोली, साकोरे, उगलेवाडी/फदालेवाडी, जवळे, पिंगळवाडी (लांडेवाडी), घोडेगांव, एकलहरे व वळती या 8 गावांतील बाधितांना उपचारानंतर घरी सोडले आहेत, नारोडीत एकाचा मृत्यू झाला. 9 गावांत एकही बाधित नसल्याने ही गावे करोनामुक्त झाली आहेत. वडगांव काशिंबेग, मंचर, अवसरी बुद्रुक, पारगांव व चपटेवाडी गावांमध्ये प्रत्येकी एक, पेठमध्ये 4, गिरवली 3, निरगुडसर 5, असे 17 रुग्णांवर भीमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटल, मंचर व पुणे या ठिकाणी उपचार चालू आहे.