सविंदणे (प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील ठिकाणी 3 वर्षे सेवा बजावल्याने केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस उपनिरिक्षक भगवान पालवे यांना ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी गडचिरोली जिल्हयात तीन वर्षे खडतर सेवा बजावली असून नक्षलवादाविरोधात चांगली कामगिरी केली आहे. पालवे हे सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात शिरुर पोलीस स्टेशनच्या टाकळी हाजी औट पोस्टला नेमणुकीस असून मुळचे नगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील रहिवासी आहे.
पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी गडचिरोली भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून हे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांचे शिरुर शहर व टाकळी हाजी परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.