मुंबई : अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, या मंदिराच्या निर्माणासाठी सरकारकडून वर्गणीची उपक्रम राबवण्यात येणार आहे. याच उपक्रमावरून आता राज्याच्या राजकारणात वादंग निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या उपक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’. https://t.co/gpka5hVjRM pic.twitter.com/O1jRWPH7fv
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 30, 2020
दरम्यान, निलेश राणे यांनी फोटो शेअर करत ट्विट केले आहे की,’ राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो ‘कारटा’.” असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर पलटवार केलं आहे.
राम मदिरांसाठी घेतल्या जात असलेल्या वर्गणीवर
तत्पूर्वी शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर भाष्य केले होते. राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो करसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे, असे म्हणत शिवसेनेने राम मंदिराच्या वर्गणीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या संपर्क अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.