पुणे – बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर-आहूजा लवकरच आपल्या आगामी ऍक्शन थ्रीलर “ब्लाइंड’ चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग ग्लासगो येथे करण्यात येत आहे. शोम मखीजा दिग्दर्शित या चित्रपटात विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे मुख्य भूमिका साकारत आहेत.
View this post on Instagram
सध्या सोनम कपूर स्कॉटलंडला असून ग्लासगो येथे क्राइम थ्रिलर “ब्लाइंड’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात एका अंध पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखविण्यात येणार आहे. जो सीरियल किलरचा शोध घेत असतो. यात विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे दिसणार आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष, अविशेक घोष यांनी केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनमचा हा चित्रपट प्रसिद्ध कोरियन “ब्लाइंड’चा हिंदी रिमेक आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचा तमिळ रीमेक देखील तयार करण्यात आला होता. ज्याचे नाव “नेत्रीकन’ असे होते. या चित्रपटात दक्षिण अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत झळकली होती. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सोनम कपूर नुकतीच “अघर् ीीं अघ’मध्ये झळकली होती. तसेच अखेरच्या वेळी तिने “द जोया फॅक्टर’ चित्रपटात दलकीर सलमानसह काम केले होते.
View this post on Instagram