नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये तयार झालेल्या करोनाच्या नव्या विषाणूचा आता भारतातही झपाट्याने पसरत आहे. करोनाचा नव्या विषाणूचा वेगाने संक्रमण होत आहे. आतापर्यंत ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे.
चिंताजनक! भारतात नव्या स्ट्रेनची एन्ट्री; ब्रिटनहून परतलेल्या 6 प्रवाशांना बाधा
करोना व्हायरसच्या नव्यास्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर, करोना चाचणीमध्ये कोणतीही त्रुटी ठेवू नये. कारण ब्रिटनमधील प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झाल्याची शक्यता आहे. यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
टेन्शन वाढलं; ब्रिटनहून आलेले 300 प्रवासी ‘नॉट रिचेबल’
युरोप आणि मध्य पूर्व आशियातून आलेल्या नागरिकांना विलगीकरणात (होम क्वारंटाइन) राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सगळ्यांचीच “जिनोम टॅपिंग’ अर्थात विषाणूच्या जनुकीय रचनेच्या अभ्यासाद्वारे चाचणी होणार आहे. सोबतच या नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही करण्यात येत आहे.
करोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे आहेत भयानक ; वाचा सविस्तर…
गेल्या महिनाभरात ३० हजार पेक्षा अधिक नागरिक ब्रिटनमधून भारतामध्ये परतले आहेत. यामधील १०० पेक्षा जास्त जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळली आहेत. या सर्वांना सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यात प्रकृतीकडे आरोग्य यंत्रणांचे लक्ष आहे.
ब्रिटनवरून आलेल्या “पॉझिटिव्ह’ रुग्णांचे जिनॉम सिक्वेन्स तपासणार
दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेला नवा विषाणूचे रुग्ण डेन्मार्क, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूरमध्येही सापडले आहेत.
जगाची चिंता वाढली ; करोनाचा नवा स्ट्रेन १६ देशांमध्ये पोहोचला
धक्कादायक! २ वर्षांच्या चिमुकलीला करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग