वडूज – वडूज येथील नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक निलेश संभाजीराव गोडसे यांची बुधवारी निवड करण्यात आली. आमदार जयकुमार गोरे समर्थक व कॉंग्रेसचे नगरसेवक श्रीकांत बनसोडे यांनी या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदासाठी शहरातील अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने स्वीकृत नगरसेवकपदची निवड चर्चेचा विषयी ठरली होती.
बुधवारी नगरपंचायत कार्यालयात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायतीची सर्व साधारणसभा झाली. यामध्ये कॉंग्रेसचे गटनेते नगरसेवक प्रदीप खुडे यांनी निलेश गोडसे यांचा स्विकृत नगरसेवक पदासाठी प्रस्ताव सादर केला होता. या पदासाठी निलेश गोडसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्षा सौ. किशोरी पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. शोभा माळी, डॉ. महेश गुरव, बांधकाम सभापती वचन शहा, नियोजन सभापती अनिल माळी, महिला व बालकल्याण सभापती काजल वाघमारे, नगरसेवक शहाजी गोडसे, विपूल गोडसे, संदीप गोडसे, अभय देशमुख, मंगल काळे, सुनिता कुंभार, शुभांगी जाधव, सुवर्णा चव्हाण, नगरसेविका डॉ. सौ. निता गोडसे, छाया पाटोळे उपस्थित होते.
निवडीनंतर गोडसे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत शहरातून मिरवणूक काढली. मिरवणुकीत माजी सरपंच अनिल गोडसे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य डॉ. संतोष गोडसे, संजय काळे, शशिकांत पाटोळे, आदी सहभागी झाले होते.