रांजणगाव गणपती : सोनेसांगवी (ता. शिरुर) येथील मल्हारी आनंदा काळे यांची शिरूर-आंबेगाव विधानसभा’ शिवसेना तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, शिवसेना सचिव संजय मोरे व युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे,
उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे यांच्याशी विचार विनीमय करून मल्हारी काळे यांची ‘शिवसेना तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे माजी खासदार आढळराव यांनी सांगितले.
रांजणगाव येथील उद्योजक अभिजीत बत्ते यांची शिवसेना उद्योग आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी सोनेसांगवी गावचे संभाजी डांगे यांसह विविध संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.