शिरूर – समाजात चांगल्या आणि वाईट गोष्टी समाजासमोर आणून त्यावर नेहमीच नजर ठेवण्याचे काम पत्रकार करत असतो. समाजात चालणाऱ्या अनेक वाईट समाजासमोर आणून प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम वर्तमानपत्र करत असते, असे प्रतिपादन शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन करण्यात आले. शिरूर नगरपालिकेतही जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. शिवसेवा मंदिराजवळ आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, विनोद भालेराव, किरण बनकर, ज्योती लोखंडे, सुरेखा शितोळे पत्रकार नितीन बारवकर, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, प्रवीण गायकवाड, मुकुंद ढोबळे, धर्मा मैड, अभिजित आंबेकर, राजाराम गायकवाड, नचिकेत काळे, पोपट पाचंगे, संतोष शिंदे, बबन वाघमारे, आप्पासाहेब ढवळे, भाऊसाहेब खपके, अर्जुन बढे, सतीश केदारी, दीपाली काळे आदी उपस्थित होते.
पत्रकार प्रा. सतीश धुमाळ म्हणाले की, लोकशाहीत प्रसारमाध्यमाची महत्वाची भूमिका आहे. बदलत्या काळानुसार होणारे बदल आत्मसात करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. शिरुर नगरपरिषदमध्येही आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते पत्रकारांच्या सन्मान करण्यात आला.