बारामती (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या ईनोवा गाडीला पुण्याहून बारामतीकडे निघाले असताना सासवड जेजुरी रस्त्यावर अपघात झाला. सुदैवाने गुजर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ईनोवा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शाळकरी विद्यार्थी रस्त्यावर आल्यामुळे हा अपघात घडला. समोर असलेल्या गाडीने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे गुजराती नवा पाठीमागून जाऊन धडकली. वेगावर नियंत्रण असल्याने पुढील अनर्थ टळला. धडक बसल्यानंतर इनोवा गाडीच्या एअर बॅग उघडल्या. त्यामुळे दुखापत झाली नाही. आपण सुखरूप असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडून ते बारामती कडे रवाना झाले होते. त्यांच्यासमवेत शुभम ठोंबरे व अमोल गावडे हे दोघे होते. गाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही.
उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव हे लग्नानिमित्त पुण्याच्या दिशेने निघाले होते. किरण गुजर यांनी फोन करून घटना सांगितल्या नंतर बाळासाहेब जाधव काही मिनिटातच येथे पोहोचले . त्यानंतर त्यांना घेऊन ते बारामती दिशेने आले. गुजर यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.