पिंपरी – मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास सांगून तिचा व्हिडीओ काढला. तो व्हिडिओ मित्र मैत्रिणींना सोशल मीडियावर पाठवून मैत्रिणीची बदनामी केली. याप्रकरणी मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नवी सांगवी येथे घडला.
तुकाराम नामदेव सावंत (वय 27, रा. सापटणे, ता. माढा, जि. सोलापूर) या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने सोमवारी (दि. 6) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पीडित तरुणी आणि आरोपी हे मित्र आहेत. आरोपीने सप्टेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत फिर्यादीला व्हॉट्सऍपवर व्हिडीओ कॉल केला. कॉल सुरु असताना त्याने तरुणीला विवस्त्र होण्यास सांगितले व व्हिडीओ केला. तो व्हिडीओ आरोपीने फिर्यादीच्या मित्र मैत्रिणींना व्हॉट्स ऍपवर पाठवला.