भाजपच भडकवतंय शेतकरी आंदोलन – राजू शेट्टी

राजू शेट्टींकडून कृषी कायद्यांची होळी

कोल्हापूर – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ च्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कृषी कायद्यांची होळी केली. ‘महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळला जात आहे.

सर्वच जनता शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जनता सोबत आल्यामुळे शेतकरी मोठा आधार मिळाला आणि समजले की या लढाईमध्ये आपण एकटे नाही. केंद्र सरकारने प्रतिष्ठा पणाला लावली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आल्यावर कशाला प्रतिष्ठा पणाला लावता’, असा सवाल उपस्थित करत भाजपचे लोक शेतकरी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

केंद्र सरकारने केलेले नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आहे. त्यामुळे ते रद्द झाले पाहिजे अशी मागणी करत शेट्टी यांनी शिरोळ येथील आपल्या निवस्थानाबाहेर कृषी कायद्यांची होळी केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.