मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही चहा विकला नाही असे त्यांचे धाकटे बंधु प्रल्हाद मोदी यांनीच उल्हासनगरातील एका कार्यक्रमात बोलताना नमूद केले आहे, तो धागा पकडत कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर चांगलाच निशाणा साधला आहे.
या संबंधात जारी केलेल्या एका ट्विटर संदेशात सावंत यांनी म्हटले आहे की, खोट्या बाता, खोटी प्रतिमा, खोटी आश्वासने व खोटे गुजरात मॉडेल सगळं खोटं! मोदींची इमारतच अशा खोट्या प्रचारावर उभी आहे. त्यावल भुलून मत दिल्यावर हात रितेच राहणार.
मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदीच म्हणाले आहेत की मोदींनी कधी चहा विकला नाही. पण स्वत:ला चहावाला असे म्हणवून मोदींनी साऱ्या देशाला मुर्ख बनवलं आहे असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.