वॉशिंग्टन – नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेच्या वतीने मानवासहित चंद्रावर पुन्हा यान पाठवण्याची मोहीम हाती घेतली असून त्यासाठी एकूण 18 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यातील निम्मे महिला उमेदवार आहेत.
तसेच राजा जॉन वारूपुतूर चारी या भारतीय वंशाच्या एका अमेरिकन अंतराळवीराचीही त्यासाठी निवड झाली आहे. चारू हे अमेरिकन हवाईदलाच्या एमआयटी या अकादमीचे पदवीधारक आहेत. चारू यांनी सन 2017 पासून अंतराळ वीराच्या संबंधातील प्रशिक्षण घेतले आहे.
ते या मोहिमेस पूर्ण पात्र आहेत, असे नासाने जाहीर केले आहे. या मोहिमेत एक महिला आणि एक पुरुष अंतराळवीर चंद्रावर पाठवला जाणार आहे. अमेरिकेची ही चांद्रयान मोहीम 2024 मध्ये होणार आहे.