IPL 2023: पंजाब किंग्जच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंजाब किंग्ज संघाचा खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनच लवकरच संघात आगमन होणार आहे. लियाम लिव्हिंगस्टोन हा इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज असून पंजाब किंग्जने त्याला 11.50 कोटी रुपयांना संघात कायम ठेवले होते.
परंतु चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये कसोटी पदार्पण करताना लिव्हिंगस्टोनच्या गुढघ्याला दुखापत झाली होती त्याचबरोबर गेल्या वर्षीपासून त्याच्या घोट्याची दुखापतही समोर आली होती. त्यामुळे तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळू शकला नव्हता. तसेच फिटनेसच्या कारणामुळे आयपीएल 2023 च्या सुरवातीच्या सामान्यांपासून लिव्हिंगस्टोनला दूर राहवे लागले होते. परंतु त्याचं पुन्हा एकदा संघात आगमन होणं ही संघासाठी महत्वाची बाब आहे.
10 एप्रिल ला संघात दाखल होणार-
लिव्हिंगस्टोनला या आठवड्याच्या अखेरपर्यंत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड कडून IPL 2023 मध्ये खेळण्यासाठी 10 एप्रिल रोजी पंजाब किंग्स संघात सामील होण्यासाठी मंजुरी देणार आहे. तो 13 एप्रिल रोजी संघाच्या चौथ्या सामन्यासाठी मैदानातही उतरू शकतो, असे सांगण्यात आले आहे. लिव्हिंगस्टोन हा पंजाब किंग्जसाठी महत्त्वाचा खेळाडू असून त्याने गेल्या मोसमात 182.08 च्या स्ट्राइक रेटने 437 धावा केल्या. यामुळे लिव्हिंगस्टोनच्या आगमनाने पंजाब किंग्जची ताकद नक्कीच वाढणार आहे.