नवी दिल्ली – मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्सचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयाचा हिरो ठरला आहे तो म्हणजे आकाश मधवाल.आकाशने मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स या सामन्यात अवघ्या 5 धावा देत 5 बळी घेत लखनौ संघाचे फायनलचे स्वप्न भंगवले आहे.
मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीत गोलंदाजांची चिंता होती. परंतु कर्णधार रोहित शर्माने आकाश मधवालवर विश्वास व्यक्त केला आणि आकाशने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. आकाशाची संघासाठी पदार्पण केल्यापासून कामगिरी जबरदस्त आहे. चला तर मग जाणून घेऊया आकाश मधवालचा क्रिकेट प्रवास
आकाश माधवाल हा उत्तराखंड राज्यातील रुरकीच्या धांडेरा भागातील रहिवासी असून त्याचे वय 29 वर्ष आहे. ज्या वयात आकाशची टी-20 क्रिकेटमधील कारकीर्द घसरत होती त्याच वयात आकाशला संधी मिळाली.
प्रशिक्षक वसीम जाफरने मधवालच्या क्रिकेट करिअरला नवा ट्विस्ट दिला. वसीम जाफर हे उत्तराखंडचे प्रशिक्षक असताना त्यांची नजर आकाशवर पडली. मधवालने आपल्या गोलंदाजीने भारताचे माजी फलंदाजांना प्रभावित केले आणि याच संधीचा फायदा उचलत 2022-23 मध्ये व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये उत्तराखंडचा कर्णधार बनला.
आकाश मधवाल अभियंताचे शिक्षण केले पूर्ण –
आकाश मधवाल हा अभियंता आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने क्रिकेटची आवड जोपासली.आणि आयपीएलमध्ये खेळणारा तो उत्तराखंडचा पहिला खेळाडू बनला आहे.
ऋषभ पंत आणि आकाश यांच्यात आहे मैत्रीचे नाते –
आकाश मधवाल आणि ऋषभ पंत हे दोघे प्रशिक्षक अवतार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. तसेच आकाश आणि ऋषभ हे दोघेही चांगले मित्र आहेत.
पंत लहान वयातच दिल्लीला स्थलांतरित झाला. त्यामुळे मधवाल आयपीएलमध्ये खेळणारा उत्तराखंडचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
आकाश मधवालची आत्तापर्यंतची क्रिकेट कारकीर्द-
आकाशने आत्तापर्यंत त्याच्या करिअरमध्ये 10 फर्स्ट क्लास, 17 लिस्ट-ए आणि 29 टी-20 सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लासमध्ये 12, लिस्ट ए मध्ये 18 आणि टी-20 मध्ये 37 विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्सचा पराभव करत फायनल च्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. 26 मे रोजी मुंबईचा उपांत्य फेरी सामना गुजरात टायटन्सच्या विरुद्ध होणार असून हा सामना कोण जिकतंय हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.