आयपीएल 2023 ची सांगता झाली आहे. अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. 29 मे रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत चेन्नईने गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर पुरस्कार सोहळा झाला, ज्यामध्ये चॅम्पियन संघ चेन्नई आणि अंतिम पराभूत संघ गुजरातला बक्षीस रक्कम देण्यात आली. यासोबतच अनेक पुरस्कारही देण्यात आले.
गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही आयपीएल विजेत्या संघाला 20 कोटी रुपये देण्यात आले. त्याचबरोबर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाच्या बक्षीस रकमेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी ही रक्कम 12.5 कोटी रुपये होती, ती तशीच ठेवण्यात आली आहे. CSK ला 20 को टींचे बक्षीस दिले गेले, तर उप विजेत्या GT ला 12.5 कोटी दिले गेले. तिसऱ्या क्रमांकावरील मुंबई इंडियन्सला 7 कोटी तर चौथ्या क्रमांकावरील लखनौ सुपर जायंट्स संघाला 6.5 कोटीचं बक्षीक्ष दिले गेले.
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगच्या 16व्या हंगामात अनेक मनोरंजक सामने पाहायला मिळाले. यामध्ये अनेक नवे खेळाडूही उदयास आले आणि त्यांचे आयुष्य बदलले. आयपीएलमध्ये खर्च केलेल्या रकमेमुळे लीग नेहमीच चर्चेत असते. संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेशिवाय इतर अनेक पुरस्कारही दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, फेअर प्ले अवॉर्ड आदी पुरस्कारांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला या सर्व पुरस्कारांबद्दल आणि त्यात दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांच्या रकमेबद्दल सांगणार आहोत.
- Emerging Player of the tournament : यशस्वी जैस्वाल (625 धावा) – 10 लाख
- Orange Cap : शुभमन गिल ( 890 धावा) – 10 लाख
- Purple Cap : मोहम्मद शमी ( 28 विकेट्स) – 10 लाख
- Most Valuable Player : शुभमन गिल ( 890 धावा) – 10 लाख
- Tiago ev electric Super Striker of the Season : ग्लेन मॅक्सवेल – 10 लाख
- Game Changer of the Season : शुभमन गिल ( 890 धावा) – 10 लाख
- Fours of the season : शुभमन गिल ( 85 चौकार) – 10 लाख
- Longest six of the season : फॅफ ड्यू प्लेसिस – 10 लाख
- Catch of the season : राशीद खान – 10 लाख
- Fair play Awards : दिल्ली कॅपिटल्स – 10 लाख
Orange Cap : संपूर्ण आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला हा पुरस्कार दिला जातो.
Purple Cap : आयपीएलच्या संपूर्ण मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज हा या पुरस्काराचा विजेता ठरतो.
Emerging Player of the tournament : हा पुरस्कार मोसमातील उगवत्या स्टारला दिला जातो. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वाल याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याला 10 लाखांचा धनादेश देण्यात आला. यशस्वीच्या जागी शिवम दुबेने पुरस्कार स्विकारला.
Most Valuable Player : आयपीएलच्या संपूर्ण हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो.
Fair play Awards : हा पुरस्कार संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक शिस्तीने खेळणाऱ्या आणि कोणताही गैरप्रकार न करणाऱ्या संघाला दिला जातो.