नवी दिल्ली – करोनाच्या संबंधात आता एक चांगली बातमी आली असून देशातील करोनाच्या सक्रिय बाधितांची संख्या कमालीची घटली आहे. आज देशातील एकूण सक्रिय करोना बाधितांची संख्या 2 लाख 81 हजार 667 इतकी आहे. नव्या करोनाग्रस्तांची झपाट्याने घटत चाललेली संख्या आणि करोना रूग्ण बरे होण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे आता देशातील सक्रिय करोना बाधितांची संख्या घटली असल्याचे आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे.
देशातील बरे झालेल्या करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 97 लाख 40 हजार 108 इतकी आहे. रिकव्हरीचा हा दर आता सर्व राज्यांमध्ये 90 टक्क्यांच्यावर गेला आहे. करोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण केरळात सर्वाधिक असून त्या खालोखाल पश्चिम बंगालचा नंबर लागतो तर महाराष्ट्र या बाबतीत तिसऱ्या क्रमाकांवर आहे.करोना बाधित रूग्ण आढळून येण्याच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात 3431 नवे करोना बाधित आढळून आले आहेत.