नवी दिल्ली – देशातील दैनंदिन स्वरूपात जे नवे करोना रुग्ण आढळून येत आहेत त्याची संख्या आता नियमीतपणे चाळीस हजारांच्या आतच नियंत्रित झाली असल्याचे सध्याचे चित्र आहे. देशात गेल्या 24 तासांत एकूण 38 हजार 949 नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या आता 3 कोटी 10 लाख 26 हजार 829 इतकी झाली आहे. देशातील कालचे ऍक्टिव्ह रुग्ण 4 लाख 30 हजार 422 इतके आहेत. एकूण रुग्णाच्या तुलनेत हे प्रमाण 1.39 टक्के इतके आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत करोनामुळे एकूण 542 रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता 4 लाख 12 हजार 351 इतका झाला आहे. गेल्या सतत 25 दिवसांत पॉझिटिव्हीटी रेट तीन टक्क्यांच्या खाली राहिला आहे. देशात काल एकूण जे 542 जण मरण पावले आहेत त्यातील 170 जण महाराष्ट्रातील आहेत.