जळगाव – सातपुडा पर्वत रांगेत ट्रेनिंग चार्टर विमान कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे. ही दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील वर्डी गावा जवळ घडली आहे. यात अन्य एक महिलादेखील जखमी झाला आहे.
या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी मदतीला धावले. यानंतर ग्रामस्थांनी चार्टर विमानमधील महिलेची सुटका करण्यात त्यांना यश मिळाले आहे. मात्र, पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
या अपघातातील जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना जंगल परिसरात घडली असल्याने या ठिकाणी पोहचण्यासाठी यंत्रणेलाही मोठे परिश्रम घ्यावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी अद्यापही मदत व बचाव कार्य सुरु आहे.