करोनालसीचा तातडीचा वापर करण्यासाठी मॉडर्नाला हवीय परवानगी

न्यूयॉर्क – मॉडर्ना या अमेरिकी कंपनीने आपली करोनालस अतिशय प्रभावी असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर, लसीचा तातडीचा वापर करण्यासाठी अमेरिकी आणि युरोपीय नियामक यंत्रणांकडे परवानगी मागण्याच्या हालचालीही त्या कंपनीने सुरू केल्या आहेत.

आमच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून लस 94.1 टक्के प्रभावी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुढे आला आहे. गंभीर प्रकरणांत लस 100 टक्के प्रभावी ठरली आहे, असे त्या कंपनीकडून सांगण्यात आले. त्या निष्कर्षांमुळे उत्साह वाढलेल्या मॉडर्नाने तातडीच्या वापरासाठी आवश्‍यक परवानगी मागण्याच्या उद्देशातून संबंधित यंत्रणांकडे अर्ज करण्याचा मनोदय जाहीर केला आहे.

संपूर्ण जगाला करोना संकटाने वेठीस धरले आहे. त्यामुळे करोनावरील लसीची प्रतीक्षा संपूर्ण जग करत आहे. लस बनवण्यासाठी जगभरात वेगाने प्रयत्न सुरू आहेत. त्यातून लसनिर्मितीसाठी अनेक कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.