अर्जुन तेंडुलकरवर 5 लाखांची बोली

मुंबई टी-टवेंटी स्पर्धेत एमडब्ल्यूएस संघाकडून खेळणार

मुंबई – लिटल मास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील अनेक वर्षे कामगिरीत सुधारणा होण्यासाठी अर्जुन झटत आहे. त्याच्या या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आणि मुंबई ट्‌वेंटी-20 लीगच्या दुस-या सत्रासाठी होणा-या लिलावात त्याने वरिष्ठ गटात प्रवेश केला आहे.

मुंबई ट्‌वेंटी-20 लीगसाठी शनिवारी झालेल्या लिलावात अर्जुनला कोणता संघ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्जुनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरस रंगली. परंतु त्याला आकाश टायगर्स एमडब्ल्यूएस संघाने चमूत घेतले. अर्जुनसाठी आकाश टायगर्स संघाने 5 लाख रुपये मोजले.

अर्जुनकडे मुंबई 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघाकडून खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय गतवर्षी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्याने तीन विकेट्‌स घेतल्या होत्या आणि दोन डावात त्याला केवळ 14 धवा करता आल्या होत्या. मात्र, डॉ. डी वाय पाटील ट्‌वेंटी-20 चषक स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. याच कामगिरीमुळे त्याला मुंबईच्या 23 वर्षांखालील संघात स्थान मिळाले. गत महिन्यात त्याने एका स्थानिक वन डे सामन्यात 23 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्वही केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.