आयुष्मान आणि भूमी पेडणेकर “बाला’मध्ये एकत्र

आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यापूर्वी “दम लगाके हैय्या’ आणि “शुभमंगल सावधान’मध्ये एकत्र दिसले होते. हे दोन्ही सिनेमे बॉक्‍स ऑफिसवर हिट झाले होते. या दोन्ही सिनेमांचा विषय सशक्‍त होताच पण त्याचबरोबर हे दोघांची जोडी आणि त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. आता “स्त्री’चे डायरेक्‍टर अमर कौशिक पुन्हा एकदा या जोडीला पडद्यावर एकत्र घेऊन येणार आहेत. “बाला’ असे त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव असणार आहे. भूमी एक समजूतदार अभिनेत्री आहे आणि तिच्याबरोबरच्या सिनेमाला प्रेक्षकांनी उचलून धरलेले आहे. त्यामुळे याही नवीन सिनेमाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील, अशी खात्री आयुष्मान खुरानाने व्यक्‍त केली आहे. तर जे विषय वास्तविक जीवनाशी साधर्म्य दाखवतात, अशा सिनेमांमध्ये आयुष्मानला काम करायला जास्त आवडते. त्यामुळेच या सिनेमांना वास्तवाचा आधार असतो. त्यात आयुष्मानबरोबर काम करताना खूप मजा येते, असे भूमीने सांगितले. जर “बाला’लाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, तर आयुष्मान- भूमीच्या हिट जोडीचीही ही हॅटट्रीक होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.