पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात राबले हजारो हात

राज्यासह परराज्यातून जलमित्र झाले सहभागी

सोलापूर – दुष्काळ आणि अठाराविश्व दारिद्रय असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्‍यातील रानमसले गावातील गावकऱ्यांनी पाणी फाऊंडेशन स्पर्धेत उतरुन गांव पाणीदार करण्या चंग बांधला आहे. यामुळे आपण ही गावातील जबाबदार नागरिक म्हणून महाश्रमदानासाठी घरातील प्रत्येक महिला , पुरुष व तरुण युवक , युवती , शाळेतील विद्यार्थी सहकुटुंब महाश्रमदानासाठी स्वतः हून हजर राहिले होते.

गावातील किराणा दूकान , हाटेल , चहा कॅंटीन , तसेच इतर व्यवसाय कडकडीत बंद करुन दुष्काळाच्या राक्षसावर गावातील व बाहेरगावाहून आलेले साडे तीन हजार जलमित्र संख्येने कंपार्टमेंट बंडींग बांधकामावर तुटून पडले होते.
गावांतून सकाळीच सजवलेल्या बैलगाडीतून बैलांना झुली , चंगाळ्या घालून बैलांच्या अंगावर ‘ पाणी अडवा , पाणी जिरवा ‘ ‘ पाणी वाचवा देश वाचवा ‘ जल बचतीचे संदेश लिहले होते. पारंपारिक पद्धतीने बाल दिंडी भगव्या पताका खांद्यावर घेऊन आबालवृद्ध टाळ मृदंगाच्या गजराज भजन गात महाश्रमदानाच्या चाल करीत केले .यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधल होते. तसेच या महाश्रमदानास सोलापूर शहर परिसरातून पाणी फाऊंडेशनच्या ‘ जलमित्र ‘ आवाहनानुसार मुंबई , पुणे , हैद्राबाद अक्कलकोट, विजयपूर , इंडी , बिदर मंगळवेढा , मोहोळ , केमवाडी नान्नज , परिसरातून जलमित्र दाखल झाले होते. तसेच सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते , राजकीय नेते मंडळी प्रशासकीय आधिकारी कर्मचारी ,विविध संघटना , तसेच रानमसले नागरिकांनी पक्ष , जातीभेद विसरुन प्रथमच एकजुटीने एकत्रित येऊन दुष्काळाशी लढा देण्यासाठी महाश्रमदानात सहभाग नोंदवला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.