मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर एकाच खळबळ उडून गेली होती. त्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असताना या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मुंब्रा रेतीबंदर जिथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता तिथेच अजून एक मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाची ओळख पटलेली असून शेख सलीम अब्दुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ४८ वर्षीय शेख अब्दुल सलीम मजूर असून मुंब्रा, रेतींबदर येथे वास्तव्यास होते.
घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस अधिकारी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. बचावकार्य पूर्ण करण्यात आलेलं असून मृतजेह पोलिसांकडे सोपवण्यात आला असल्याचे आपत्ती विभाग आणि पालिकेकडून सांगण्यात आले आहे.