नगर – शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज जिल्ह्यात 660 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या 3 हजार 120 इतकी झाली आहे. तसेच 452 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 78 हजार 886 इतकी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचा उद्रेक वाढत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरात 89, अकोले 8, जामखेड 6, कर्जत 18, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 7, नेवासे 5, पारनेर 8, पाथर्डी 9, राहाता 12, राहुरी 1, संगमनेर 25, शेवगाव 13, कॅन्टोन्मेंट 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 119, अकोले 6, जामखेड 1, कर्जत 4, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 18, नेवासे 13, पारनेर 11, पाथर्डी 3, राहाता 59, राहुरी 19, संगमनेर 32, शेवगाव 1, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 20, कॅन्टोन्मेंट 3, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 80 जण बाधित आढळून आले. मनपा हद्ीत 30, अकोले 2, जामखेड 5, नगर ग्रामीण 1, नेवासे 3, पाथर्डी 19, राहाता 6, राहुरी 7, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 3, कॅन्टोन्मेंट 1 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 123, अकोले 10, जामखेड 09, कर्जत 17, कोपरगाव 31, नगर ग्रामीण 10, नेवासे 14, पारनेर 28, पाथर्डी 15, राहाता 70, राहुरी 12, संगमनेर 46, शेवगाव 5, श्रीगोंदा 7, श्रीरामपूर 46 आणि इतर जिल्हा 9 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या – 78886
उपचार सुरू असलेले रुग्ण – 3120
जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 1184
एकूण रुग्णसंख्या – 83190