नवी दिल्ली – जानेवारी 2020 पासून कोविड -19 चाचण्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली असून आज 4 कोटींचा टप्पा पूर्ण झाला. आज भारताने 4 कोटी 4 लाख 6 हजार 609 कोविड चाचण्या पूर्ण करून एक नवा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
जानेवारी 2020 मधे पुण्यातील प्रयोगशाळेत केवळ एका चाचणीने सुरुवात करत 4 कोटी चाचण्या पूर्ण करत भारताने लांबवरचा पल्ला गाठला आहे.
एका दिवसात पूर्ण करण्याच्या चाचण्यांतही वाढ झाली आहे. 10 लाख लोकांच्या चाचण्या एका दिवशी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आधीच गाठले असून गेल्या 24 तासांत 9 लाख 28 हजार 761 चाचण्या केल्या गेल्या असून त्यात 29,280 ची वाढ झाली आहे.
अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातही चाचण्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अखेरीस पॉझिटीव्हिटीचा दर घटेल. राष्ट्रीय पॉझिटीव्हिटीचा दर कमी झाला असून तो 8.57 टक्के आहे. त्यात सतत घट होत आहे. देशात 1576 प्रयोगशाळा असून त्यातील 1002 सरकारी तर 574 खाजगी आहेत.