अक्षय्य तृतीया हा सनातन धर्मात शुभ दिवस मानला जातो. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. यावर्षी अक्षय्य तृतीया 10 मे 2024 रोजी साजरी होणार आहे. या सणाला सोने खरेदी केल्याने अपार संपत्ती मिळते असे मानले जाते.
दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशात सराफा बाजारात मोठी उलाढाल होते. त्यामुळे या वर्षीदेखील लोक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या दागिन्यांच्या रुपात सोन्याची खरेदी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जाणून घ्या आजचा बाजार ‘भाव’
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,४३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
चांदीची किंमत
चांदी ८३,०३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८१,८६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,३४० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,२८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,२८० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,२८० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३४० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,२८० रुपये आहे.