नेवासा – सातारा जिल्ह्यातील मेढा (ता.जावळी) येथे दोन खुन करुन पसार झालेल्या १९ वर्षिय खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला नेवासा पोलीसांनी पकडून कारवाई करुन सातारा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याचे पो.कॉ. शाम गुंजाळ, पो.कॉ.सुमित करंजकर, महिला पोलीस हवालदार सविता उंदरे व वाहतुक शाखेचे किरण गायकवाड यांच्या पथकाने केली.
याबाबत नेवासा पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि.१६) रोजी दुपारी चाडेचार वाजेच्या दरम्यान मेढा (ता.जावळी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकीव येथील धबधब्याजवळ अक्षय शामराव अंबवले (रा. बसाप्पाची वाडी) व गणेश अंकुश फडतरे (रा.करंजे , ता.जि.सातारा) या दोन्ही इसमांना लाथा बुक्क्यानी मारहाण करुन धबधब्याच्या दरीत ढकलून देवून त्यांचा खुन केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपीची सातारा पोलीसांनी माहीती घेवून या गुन्ह्यातील आरोपी साहील मेहबुब शेख (वय १९, रा.भिमाबाई आंबेडकरनगर सदर बाजार, सातारा ता.जि. सातारा) हा आरोपी माल वाहतुक ट्रक (क्रमांक (एम.एच.५००७३६) बसुन सातारा येथून जालन्याकडे येत असल्याची माहिती सातारा पोलीसांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि.डोईफोडे यांना दिली. त्यानंतर नेवासा पोलीसांनी खडका फाटा येथील टोलनाक्यावर सापळा रचून आरोपीला पकडून सातारा पोलीसांच्या ताब्यात दिले.