मुंबई – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्वत: सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले असून संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
”मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.” असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात व निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांच्या लग्नात हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक जण यांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता आहे.