मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
अशात आता अजित पवार यांच्या सोबत असलेले राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी बोलतांना मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले,’सुप्रिया सुळे यांच्याच उपस्थित भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं. सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं. अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळेदेखील होत्या. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, छगन भुजबळ हे नेतेही होते. ह्या नेत्यांनी सत्तेत जायचा निर्णय घेतला असेही ते म्हणाले आहे.
तर ज्या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या दिवशी अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. आधी ही बैठक प्रदेशाध्यक्षपदासाठी असल्याचं बोललं गेलं. मात्र नंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे ही बैठक केवळ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी झाली नसल्याचं स्पष्ट झालं. त्यावरही सुनील शेळके यांनी भाष्य केल.