मुंबई – बॉलीवूडच्या अनेक स्टारकिड्सची सध्या चर्चा रंगली आहे. अनेकांची लव्हस्टोरी सध्या समोर येत आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी यांच्या रिलेशनशिपबाबत अनेकदा चर्चा होत असते. याशिवाय अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान, नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही अफेअरची सर्वत्र चर्चा आहे. यात याच आता ‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी देखील बॉलीवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिमन्यू दसानी ‘द फॅमेली मॅन’ वेब सीरिजमधील अभिनेत्री श्रेया धन्वंतरी हिला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. हे दोघेही ‘नौसिखिये’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण भोपाळ येथे झाले असून यादरम्यान त्यांचे एकमेकांवर प्रेम झाल्याचे म्हंटले जात आहे. मात्र अद्याप या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कबुली दिलेली नाही.
दरम्यान, अभिमन्यूने ‘मर्द को दर्द नही होता’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय त्याने ‘किसी का भाई किसी की जान’, ‘निकम्मा’, ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’, सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर श्रेयाने ‘स्कॅम 1992’, ‘लूप लपेटा’ ‘चुप’ आणि ‘व्हाय चीट इंडिया’ सिनेमात भूमिका साकारली आहे.