काँग्रेस-राष्ट्रवादीची धाकधूक वाढली, हे तीन मोठे नेते भाजपच्या वाटेवर?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससह राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती. अगोदर राष्ट्रवादीत असलेले भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या दिग्गज नेत्यांना भाजपात आणण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस पक्षाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. वडाळा मतदारसंघातून तब्बल सहावेळा विधानसभेवर निवडून आलेले काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचा विकास करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, असे सांगून कोळंबकर यांनी यापूर्वीच भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.