मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून राज्यातील ड्रग्स प्रकरणावरून नवनवीन आरोप आणि खुलासे करत असल्याचे दिसत आहेत.
नबाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातला पहिला सासरा आहे…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2021
प्रकणावरील कारवाईवरून सध्या विरोधीपक्षाकडून नवाब मालिकांवर टीका केले जात आहे.मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप केले आहे. आता या आरोपांवर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून वानखेडे यांना पाठिंबा दर्शवला.
नबाब मलिक रोज डोक्यात वारा शिरल्यासारखं बरळतायत. हाती पुरावे असतील तर कोर्टात जा की?
नाही तर वर्गणी काढून यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करा.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2021
दरम्यान,भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी समीर वानखेडे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं म्हटलं. तसेच ट्विट करत नवाब मालिकांवर खोचक टीका केली आहे की,’नबाब मलिक रोज डोक्यात वारा शिरल्यासारखं बरळतायत. हाती पुरावे असतील तर कोर्टात जा की? नाही तर वर्गणी काढून यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करा. ते पुढे म्हणाले, ‘नबाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातला पहिला सासरा आहे…’असं म्हणत त्यांनी मालिकांवर निशाणा साधला आहे.