मुंबई – भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनियाने भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आपला पद्मश्री पुरस्कार परत दिला आहे. या पुरस्कार वापसीनंतर भाजपने आता बजरंग पुनियावर तुफान हल्ला चढवला. “मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित.मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध”, असे ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, इतिहास याद रखेगा.पद्मश्री पुरस्कार फूटपाथवर ठेवणे हा समस्त भारतीयांचा, भारत सरकारचा व देशाचा अपमान आहे. मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही एवढं निश्चित. मुजोर कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा तीव्र निषेध, असे ट्विट त्यांनी केले.
इतकंच नाही तर “निवडणुका जवळ आल्या की अवॉर्ड वापसी गँग सक्रिय होते, हा २०१४ पासूनचा देशाला आलेला अनुभव आहे. ही गँग पुरस्कार तर परत करते मात्र पुरस्काराची रक्कम परत करते की नाही, हे जाणून घेण्यासाठी जनता उत्सुक आहे. सरकारी नोकऱ्या आणि निवासही परत करा, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.