वडगाव मावळ – मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारपासून (दि.26) गाव भेट दौरा सुरू करण्यात येणार आहे. “गाव तेथे राष्ट्रवादी, घर तेथे कार्यकर्ता’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादी कॉंग्रेस संघटनात्मक बांधणीसाठी खेडोपाडी पोहचणार आहे. केवळ संघटनात्मक बाबीवरचा हा गावभेट दौरा नसून गाव पातळीवरील समस्या या भेटीत जाणून घेणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.
“राष्ट्रवादी आपल्या दारी’ या अभियानास मंगळवारी (दि.26) सकाळी 9 वाजता नाणे मावळतील वाडिवळे येथील संगमेश्वराचे दर्शन घेऊन पहिल्या टप्प्यातील गावभेट दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या टप्प्यात नाणे मावळातील वाडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडीतील गावांच्या भेटी घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या फलकांचे अनावरण करण्यात येणार आहे.
“चला गावच्या समस्या जाणून घेऊ या, विकासाच्या वाटा शोध’ ही टॅग लाईन घेऊन राष्ट्रवादी वाड्या- वस्तीवर पोहचवून पक्षाची ध्येये धोरण सांगणार आहे. देशाह मावळात निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ, अवकाळी पावसासारखी नैसर्गिक संकटे आली. करोना महामारी आली होती. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले, मागील दोन वर्षात विविध नैसर्गिक आपत्ती येऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनील शेळके यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विविध योजना थेट जनतेच्या दारात घेऊन जाण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. गावभेट दौऱ्यात नागरिकांनी सत्कार सोहळे न करता आपल्या समस्यांची निवेदन द्यावीत.दारात घेऊन जाण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. गावभेट दौऱ्यात नागरिकांनी सत्कार सोहळे न करता आपल्या समस्यांची निवेदन द्यावीत.