Sushma Andhare : नाशिकच्या ड्रग्स प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेणे सुषमा अंधारे यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. कारण नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणी मंत्री दादा भुसे यांची बदनामी केल्यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांना वकीलांमार्फत अंधारे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. यात सुरवातीला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दादा भुसेंने नाव घेतले होते. त्यावेळी दादा भुसे यांनी देखील कोणत्याही चौकशीला समोर जाण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी दादा भुसे यांचे नाव घेतले आहे. नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे दादा भुसे यांनी हे आरोप धुडकावून लावत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत दादा भुसेंसह शंभूराज देसाई यांचा नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचे सांगितले होते. त्यांच्या चौकशीसह नार्को टेस्ट करा असेही सांगण्यात आले होते, त्यानंतर दादा भुसे यांनी प्रत्युत्तर देताना आपला कोणताही संबंध नाही. काय चौकशी करायची ती करा, आमची तयारी असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर आता मात्र मंत्री दादा भुसे यांच्याकडून सुषमा अंधारे यांना नोटीस पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ड्रग्स प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेणे सुषमा अंधारे यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. ड्रग्ज प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागा, असा नोटीसीत उल्लेख करण्यात आला आहे.
नाशिकच्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मंत्री भुसे यांच्याकडे सुषमा अंधारे यांनी अंगुलीनिर्देश केला होता. त्यामुळे आता दादा भुसे यांनी विविध वर्तमानपत्राचा दाखला देत भुसे यांची बदनामी केल्यासंदर्भात वकीलांमार्फत अंधारे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागा, असा नोटीसीत उल्लेख करण्यात आला आहे. तसेच नोटीसीला उत्तर न दिल्यास मानहानीचा दावा दाखल होणार असा इशारा देखील देण्यात आला आहे. खा.संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता सुषमा अंधारे यांच्यावर मंत्री दादा भुसे मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे दिसते आहे.