मुंबई – अभिनेता आदित्य रॉय कपूर ‘आशिकी 2’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. चित्रपटांव्यतिरक्त आदित्य नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य रॉय कपूर हा अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र अद्यापही दोघांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
परंतु आता आदित्य एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. ज्यामध्ये तो चाहत्यांच्या गर्दीत अडकलेला दिसतो. त्याचं झालं असं की, एक कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर आदित्य रॉय कपूर याला पाहून चाहत्यांनी अत्यंत मोठी गर्दी केली. आदित्य रॉय कपूर याला गर्दीतून काढण्यासाठी चाहत्यांना धक्काबुक्की करताना काही सिक्योरिटी गार्ड दिसले. हा प्रकार लक्षात येताच आदित्य रॉय कपूर याने त्यांना थांबवले.
पुढे आदित्य रॉय कपूर हा म्हणताना दिसतोय की, ‘धक्काबुक्की अजिबात करू नका, त्यांना लागू शकते.’ पुढे आदित्य रॉय कपूर हा एका सिक्योरिटी गार्डचा हात पकडताना देखील दिसतो. यानंतर चाहत्यांनी मोठी गर्दी त्याच्याभोवती केली. चाहत्यांच्या गर्दीमधून निघणे देखील आदित्य रॉय कपूर याला अवघड झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर स्वत: तो या गर्दीतून मार्ग काढून निघताना दिसतो.
View this post on Instagram
यावेळी महिला चाहत्याही उपस्थित होत्या. आदित्यसोबत एक सेल्फी घेण्यासाठी त्यांची ही धडपड चालू असल्याचे या व्हिडिओत दिसते. मात्र आदित्यच्या या कृतीचे सोशल मीडियावर अनेकजण करत आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.