मुंबई – अभिनेत्री सोनम कपूरने चित्रपटांसह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिचा मुलगा वायु याचा देखील काही दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आता सोनमने नवे आलिशान घर खरेदी केले आहे. त्याची झलकही तिने सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना दाखवली आहे. विशेष म्हणजे सोनमचे दिल्ली आणि लंडनमध्ये सुद्धा आलिशान घर आहे.
नवरात्रीच्या मुहुर्तावर खरेदी केलेल्या नव्या घरात सोनम कपूर शिफ्ट झाली असून त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गुलाबी ड्रेस, बिंदी, कानात झुमके अशा लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. खिडकीजवळ एका खुर्चीवर बसून तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिच्या आलिशान घराची झलक दिसत असून घरात मोठे पडदे आणि बॅकग्राऊंडला सुंदर नक्षीकाम केलेलं दिसत आहे.
View this post on Instagram
हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘या आठवड्यात आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. आम्ही खूप उत्साहात आहोत आणि या नवीन घरात आठवणी तयार करण्यासाठी आम्ही फार आतुर आहोत.’ सध्या तिच्यावर चाहत्यांसह बॉलीवूड कलाकारांकडून देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, सोनमने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले असून मे 2023 मध्ये त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. सध्या ती मुलगा वायुसोबत अधिक वेळ घालवणे पसंत करत आहे.