narayan rane | महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
अशात नुकतीच भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजप पक्षात नुकतेच प्रवेश केलेलं अशोक चव्हाण तर पुण्यातील मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. तर केंद्री मंत्री नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या चर्चांवर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणेंऐवजी आदल्या दिवशी भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राणेंचा पत्ता कापला. अशातच आता आपण लोकसभा निवडणुकीसाठी देखील इच्छुक नसल्याचं मोठं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. ते पुढे म्हणाले,’रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आमचाच हक्क आहे. दावा आहे आणि तो कायम आहे. उमेदवार कोण असेल तर वरिष्ठ ठरवतील. तो त्यांचा अधिकार आहे. उमेदवार हा कमळ निशाणीवरचा असेल एवढं नक्की.’ ‘लोकसभेसाठी मी इच्छुक वैगरे कुठेही नाही. या सगळ्याबाबत निवणडुकीआधी बोलणं उचित नाही. पक्षाचे प्रमुख लोकं आहेत ते याबाबत ठरवतील.’ असं मोठं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. जर नारायण राणे हे लोकसभेसाठी तयार नसतील तर या मतदारासंघात नेमका कोणता उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा
Sharad Pawar । शरद पवारांची सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया ‘लोकशाहीचा हा मोठा विजय’
gold silver price today। खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोन्या-चांदीचा आजचा ‘भाव’