Ashok Chavan | Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष जोरदार कामाला लागला आहे. जवळपास आता सर्वच जागांवर उमेदवारी जाहीर झालेली आहे. असे असताना प्रचाराला वेग आला आहे.
अश्यातच, नुकतेच भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. नांदेडमधून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाच्या स्टार प्रचारक यादीत त्यांचे नाव होते.
त्यांनी घेतलेल्या प्रचार सभेत अशोक चव्हाण यांनी केलेली डायलॉगबाजीची सर्वत्र चर्चा आहे. “जो मैं बोलता हूँ, वह करता हूँ..!, असा फिल्मी डायलॉग त्यांनी यावेळी मारला. । Ashok Chavan | Lok Sabha Election 2024
भाजप नेते अशोक चव्हाण म्हणाले, भाजपचे जुने लोक आणि काँग्रेसमधून आज भाजपमध्ये सहभागी झालेले लोक आहेत. त्यामुळे आता आपली ताकद डबल होणार आहे. आपली शक्ती डबल होणार आहे. डबल ताकद झाल्यावर और किसीको देखने की जरुरत नहीं है.
प्रतापराव और हम अलग अलग थे. सात से दस साल से वो मेरेको पानी में देखते थे और मैं उनको देखता था. अब हम दोनो एकसाथ आ गए. अशोक चव्हाण की आदत ऐसी नहीं की सामने एक और पिछे एक.
जो मैं बोलता हूँ, वो करके दिखाता हूँ. मग ते विकासाचे काम असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा आत्महत्याग्रस्तांचे प्रश्न असो, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटले. । Ashok Chavan | Lok Sabha Election 2024