gold silver price today । सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
सोने
मागील आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात घसरण दिसून आली. तर त्यानंतर किंमती वधारल्या. आठवड्याच्या शेवटी 16 फेब्रुवारी रोजी 200 तर 17 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी महागले. तर 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी
मागील आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 14 फेब्रुवारी रोजी 1500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 15 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. तर 16 फेब्रुवारी रोजी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या. 17 फेब्रुवारी रोजी 900 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर सोमवारी, 20 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,८५२ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,०२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,८५२ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०२० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,८५२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०२० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५६,८५२ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०२० रुपये आहे.
नेमक्या कशा ठरवल्या जातात सोन्या-चांदीच्या किमती ?
देशांतर्गत बाजारात सोन्या आणि चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार दररोज ठरवल्या जातात. सोन्या चांदीच्या दिवसातील शेवटचा व्यवहार दुसऱ्या दिवसाचा बाजारभाव मानला जातो. त्यानुसार विविध शहरांतील सराफा बाजारात भाव ठरवले जातात. मग किरकोळ (रिटेल) विक्रेता मेकिंग चार्जेस लावून सवलतीच्या दरात दागिने विकतो. सांस्कृतिक तसेच गुंतवणुकीचे मूल्य आणि लग्नसराई व सणासुदीच्या काळातील भूमिका यामुळे सोन्याला खूप महत्त्व आहे.
हेही वाचा
Vikhe Patil on Balasaheb Thorat । ‘…तर काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात’
Sharad Pawar । शरद पवारांची सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया ‘लोकशाहीचा हा मोठा विजय’