काँग्रेसच्या राजीनामा सत्रात नाना पटोलेंचेही नाव; आतापर्यंत १२० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सादर

नागपूर – भाजपमधील पक्षांतर्गत घुसमटीमुळे काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नाना पटोले यांनी आज लोकसभा निवडणुकांमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत शेतकरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी समजूत घातल्यानंतरही राहुल गांधी हे आपल्या निर्णयावर ठाम असून राहुल यांच्या समर्थनार्थ आतापर्यंत पक्षातील १२० नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे.

तत्पूर्वी, काल राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शिला दीक्षित यांनी दिल्ली काँग्रेस कमिटी तातडीने बरखास्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.