भाजपा भ्रष्टाचारी पक्ष असून खोटं बोलून देशात सत्ता आणली आहे. खोटं बोल पण रेटून बोल हाच भाजपचा मूलमंत्र असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे प्रतिनिधीना भ्रष्टाचार करताना रंगेहात पकडले आहे. हे सर्व जनतेला समजले आहे. पिंपरी- चिंचवड शहराचे शिल्पकार कै. प्रा. रामकृष्ण मोरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरातील लोक कॉंग्रेसला साथ देणार आहे. कॉग्रेस पक्ष लोकांना अपेक्षित आहे, असेही मत माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशान्वये पिंपरी-चिंचवड व पुणे शहर कॉंग्रेस कमिटी आयोजित परिवर्तन रॅलीचे प्रारंभ मुकाई चौक किवळे येथे करण्यात आले. पिंपरी शहर जिल्हा कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या मार्गदर्शनात मुकाई चौक किवळे येथून दुचाकी रॅलीचे शुभारंभ कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पटोले यांच्या हस्ते झाले.
देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा सत्कार करण्यात आला. शहर महिलाध्यक्षा वैशाली जगताप, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा राणी पांडीयन, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूर शेख, सरचिटणीस गोपाळ व्यंकोबा राव, सहसचिव बबन टोम्पे, गीता राजलिंगम, तवमनी अम्मावसी, शोभा टोम्पे, पिंपरी-चिंचवड शहर युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला शहराध्यक्ष सायली नढे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, विश्वास गजरमल, अभिमन्यू दहितुले आदी यावेळी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 24 मुकाई चौक येथे रॅलीचे नियोजन चिंचवड विधान सभा कॉंग्रेसचे प्रमुख ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वानाथ जगताप, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉग्रेसचे सरचिटणीस शाम भोसले, राजू ठोकळे, अबुकर लांडगे यांनी केले.