Wimbledon 2024 & Sumit Nagal :- भारतीय टेनिसपटू सुमित नागल पाच वर्षांनंतर विम्बल्डनच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळवणारा पहिला भारतीय ठरणार आहे. जागतिक क्रमवारीत 94व्या क्रमांकावर असलेल्या नागल 26 मेपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनच्या मुख्य फेरीतही थेट खेळणार आहे.
याआधी, प्रजनेश गुणेश्वरन 2019 मध्ये विम्बल्डनच्या मुख्य फेरीत थेट खेळणारा शेवटचा भारतीय होता. मात्र, पहिल्याच फेरीत तो पराभूत झाला. नागल अलीकडेच जागतिक क्रमवारीत 80 व्या स्थानावर पोहोचला होता, ज्यामुळे त्याला फ्रेंच ओपनमध्ये थेट प्रवेश मिळाला होता.
Paris 2024 Olympics : ऑलिम्पिकपूर्वी लक्ष्य सेन आणि पी.व्ही. सिंधू घेणार परदेशात प्रशिक्षण…
नागलने याआधी 2018 मध्ये विम्बल्डनच्या पात्रता फेरीत भाग घेतला होता, ज्यामध्ये त्याला पोलंड देशाचा खेळाडू रामिल मजक्रजाक याच्याकडून सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.