बंगळुरू – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्तिकने अद्याप आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. पण, आयपीएलच्या डिजिटल ब्रॉडकास्टर जिओ सिनेमाने जारी केलेल्या फोटो आणि व्हिडिओवरून असे मानले जात आहे की, कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे.
1⃣ #TATAIPL 🏆
2⃣nd – most dismissals by a WK in #IPL 💪
3⃣rd – most appearances in the league’s history! 🤯#IPLonJioCinema #RRvRCB #DineshKarthik #TATAIPLPlayoffs pic.twitter.com/dXYJz6skOi— JioCinema (@JioCinema) May 22, 2024
कार्तिक (257) हा सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारा दुसरा खेळाडू आहे. या यादीत एमएस धोनी 264 सामन्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. 17 वर्षांच्या आयपीएल प्रवासात कार्तिक 6 आयपीएल संघांसाठी खेळला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यानंतर कार्तिकने ज्या प्रकारे आपल्या संघसहकाऱ्यांना भेटून प्रेक्षकांना अभिवादन केले, त्यावरून आता कार्तिकने आयपीएलला अलविदा केल्याचे निश्चित झाले आहे. चालू मोसमात त्याने 15 सामन्यांत 187.36 च्या स्ट्राईक रेटने 326 धावा केल्या. आरसीबीसाठी या मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो चौथा खेळाडू आहे.
आयपीएल 2022 मध्ये कार्तिकच्या चमकदार कामगिरीनंतर त्याला टी-20 विश्वकरंडकासाठी संघात समाविष्ट करण्यात आले होते. जेथे त्याने 16 सामन्यांमध्ये 183.33 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या सर्व हंगामांत सहभाग
कार्तिक हा सात खेळाडूंपैकी एक आहे जे आतापर्यंत आयपीएलच्या सर्व हंगामात (16) भाग राहिले आहेत. 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून, तो रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, वृद्धिमान साहा आणि मनीष पांडे यांच्यासोबत खेळत आहे.
कार्तिकची कामगिरी
कार्तिकने दिल्ली डेअरडेव्हिल्समधून आयपीएलमधील कारकिर्दीची सुरुवात केली. तो किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. या काळात त्याने 257 सामन्यांत 26.32 च्या सरासरीने 4842 धावा केल्या. ज्यामध्ये 22 अर्धशतके झळकावली आहेत.