नवी दिल्ली, – पश्चिम उत्तर प्रदेशात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार करण्याची घटना घडल्यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी पाचही राज्यांच्या मुख्य सचिवांना सर्व राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला आहे.
स्टार प्रचारक हे निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांची सुरक्षा मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे मतही निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे.
स्टार प्रचारकांनीही संबंधीत राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तसेच आपल्या दौऱ्याच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपल्या दौऱ्याची व नियोजित प्रचार मार्गाची सविस्तर माहिती सादर करावी अशी सुचनाही त्यांना करण्यात आली आहे. या सुरक्षेसाठी राज्य तसेच जिल्हा पातळीवर एक नोडल अधिकारी नियुक्त केला जावा अशी सुचनाही निवडणूक आयोगाने केली आहे.