मुंबई – रामनवमी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरात रामनवमी हा पवित्र सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील रामनवमीच्या जोरदार तयारी करण्यात आली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखाल रामनवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. अशातच आज रामनवमी निमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा एक Video तुफान व्हायरल होतो आहे.
रामनवमीच्या नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवनीत राणा यांनी डोक्याला भगवा गमछा तथा उपरणं बांधलंय. काळा पंजाबी ड्रेस परिधान करून त्यांनी बुलेट स्वारी केली आहे. ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.. जय श्रीराम असे म्हणत नवनीत राणा यांनी बुलेटस्वारीला सुरुवात केली. नवनीत राणा यांचा हा व्हिडिओ आता चर्चेत आला आहे.
पहा नवनीत राणा यांचा व्हिडिओ ….
खासदार नवनीत राणांची बुलेटस्वारी pic.twitter.com/l0t2lHNl3K
— manjiri Kalwit (@KalwitManjiri) March 30, 2023