छत्रपती संभाजीनगर – काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन गटात वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वाहनांची जाळपोळ झाल्याचे देखील समोर आले. या राड्यानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिक्रिया समोर आले आहे. तसेच भुमरे याबाबतची सर्व माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत.
या राड्याबाबत बोलताना भुमरे म्हणाले,”रात्री दोन गटात राडा झाला यावेळी गाड्या देखील जाळण्यात आल्या. त्यात पोलिसांच्या गाड्यांचा देखील समावेश होता.दगड फेक सुद्धा झाली. पवित्र रमजानचा महिना सुरु आहे त्यासोबत राम नवमी देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतात पाळावी” असं आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केली आहे. तसेच ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
काय घडलं नेमकं
किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री बारा नंतर किरकोळ कारणावरून राडा झाला. यावेळी अनेकजण गोळा झाले होते. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. यामध्ये पोलिसांची वाहने देखील जाळली.
Maharashtra | A clash broke out between two groups in Chhatrapati Sambhajinagar’s Kiradpura area
Stones were pelted, some private & police vehicles were set on fire. Police used force to disperse the people and now the situation is peaceful. Police will take strict action… pic.twitter.com/u9qa5XYyPk
— ANI (@ANI) March 30, 2023
राड्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवल्याचे समजते. तसेच कोणत्याही मंदिराचे नुकसान झालेलं नसून फॉरवर्ड मेसेज आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.