१२ व्या मजल्यावरुन उडी घेत माजी महिला पत्रकाराची ७ वर्षाच्या मुलासह आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप

मुंबई – १२ व्या मजल्यावरुन उडी घेत एका माजी महिला पत्रकाराने आपल्या सात वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. शहरातील चांदिवलीतील नहरे अमृत शक्ती निवासी परिसरातील टिलिपिया इमारतीमध्ये हा प्रकार घडला आहे. आत्महत्येपूर्वी महिलने सुसाईड नोट लिहत गंभीर आरोप केले आहेत.

रेश्मा ट्रेंचिल. वय ४४ असे आत्महत्या करणाऱ्या माजी महिला पत्रकाराचे नाव आहे. साकीनाका पोलिसात या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेश्माने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याच इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबाविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

रेश्मा आणि तिचा पती आपला मुलगा याच्यासह 10 एप्रिल रोजी नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेले. तेव्हापासून आरोपी कुटुंबियांसोबत त्यांचे मतभेद होते. गेल्या काही दिवासांपूर्वी करोनामुळे रेश्माच्या पतीचा मृत्यू झाला होता त्यामुळे ती नैराश्यात सुद्धा होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

या आत्महत्येनंतर विभागीय पोलीस आयुक्त महेश्वर रेड्डी आणि सहायक पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रेश्माच्या एका पानाच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी कुटूंबाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.