नारायणगाव (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खबरदारी म्हणून स्वतःची करोना चाचणी करून घेतली. यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीदेखील मार्गदर्शक सूचना व आवश्यकता म्हणून त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे.
मागील कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यातील काही राजकीय नेत्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील काहीजण उपचारानंतर घरी विलगीकरणात आहेत. तर काहींवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांचा विचार करता करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. यात अनेक राजकीय नेते, पदाधिकारी बाधित होण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा विचार करता डॉ. कोल्हे हे होम क्वारंटाइन झाले आहेत.